खुशबू जयेश भन्साळी च्या वाढदिवसाची पार्टी गुरुवारी कमला मिल कंपाऊंडमधील हॉटेल मोजोस बिस्त्रो रेस्टॉरंट ऍण्ड पबमध्ये आयोजित करण्यात आली होती. खुशबू पती जयेश आणि बहीण चेरीसोबत आली होती.अनेक आमंत्रित पाहुणे सुद्धा आले होते.उशीर झाला म्हणून काही जण निघून गेले. मध्यरात्री पबमध्ये आग लागल्यानंतर पळापळ झाली. खुशबू आणि किंजल या दोघीही इतरां प्रमाणे जीव वाचण्यासाठी पळू लागल्या. खुशबूचे पती जयेश आणि बहीण चेरी पबबाहेर सुरक्षित बाहेर पडू शकले.खुशबू आत अडकली. काही क्षणांसाठी ती बाहेरही आली होती, मात्र पुन्हा आत गेली असेही समजते.आग लागल्याची बोंबाबोंब होताच सर्वचजण जीव मुठीत घेऊन तत्काळ एक्झिट गेटच्या दिशेने धावले, मात्र नेमके त्या गेटजवळ सामान ठेवण्यात आले होते. त्यामुळे एक्झिट गेट काही उघडता आला नाही. परिणामी ज्यांना तेथून बाहेर पळता आले ते निसटले, पण अनेकांनी लपण्यासाठी बाथरूमचा आसरा घेतला. सर्वजण एकाच ठिकाणी आले आणि धुरामध्ये फसले. तिथे त्यांना काहीच हालचाल करता आली नाही. धुरामध्ये ते गुदमरले. बाथरूमचा आसरा त्यांच्या जिवावर बेतला<br /><br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews